Thursday, June 19, 2025
Google search engine
HomeAdministrativeकेंद्र सरकारकडून नव्या आरबीआय गव्हर्नरची घोषणा

केंद्र सरकारकडून नव्या आरबीआय गव्हर्नरची घोषणा

नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून नव्या आरबीआय गव्हर्नरची घोषणा करण्यात आली आहे. संजय मल्होत्रा हे नवे आरबीआय गव्हर्नर असणार आहेत. पुढील तीन वर्ष ते या पदावर असणार आहेत. शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर रोजी संपत होता. त्यानंतर केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर रोजी संपत होता. दास यांना एक्स्टेन्शन मिळणार अशी चर्चा होती. मात्र, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीकडून सध्याला महसूल सचिव असलेल्या संजय मल्होत्रा यांची नियुक्ती नव्या आरबीआय गव्हर्नरपदी करण्यात आल्याचं जाहीर केलं गेलंय.
संजय मल्होत्रा  हे 1990 च्या बॅचे आणि राजस्थान केडरचे सनदी अधिकारी आहेत. त्यांनी कानपूरमधून कंप्यूटर विज्ञान मध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळवली आहे. याशिवाय त्यांनी अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातून सार्वजनिक धोरणात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. संजय मल्होत्रा ​​यांनी ऊर्जा, वित्त आणि कर, माहिती तंत्रज्ञान, खाणी इत्यादींसह विविध क्षेत्रांमध्ये काम केले आहे. सध्या ते अर्थ मंत्रालयात सचिव (महसूल) आहेत. त्यांनी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागात सचिवपद भूषवले होते.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News