Saturday, December 6, 2025
Google search engine
Homecrimeअज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार

कोल्हापुर- अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने बसाप्पा यल्लाप्पा कुरी (वय 66.रा.शाहुपुरी) यांचा सीपीआर रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यु झाला.हा प्रकार बुधवार (दि.10) रोजी सकाळी नऊच्या सुमारास घडला होता.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

यातील मयत हे मुळचे सौंदती (कर्नाटक ) येथील असून काही वर्षापासून कोल्हापुरात शाहुपुरी येथे रहात आहेत.ते खुदाईचे काम करतात.बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास पान आणण्यासाठी जात असताना पाठीमागून येत असलेल्या वाहनाने त्यांना जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी झाले होते.त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे उपचार चालू असताना मृत्यु झाला.अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.त्यांच्या पश्च्यात पत्नी ,दोन मुले आणि दोन मुली आहेत.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News