दोनवडे: रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक करत असताना होणारे अपघात टाळण्यासाठी करवीर पोलिसांनी खास मोहीम हाती घेतले असून आज कुडित्रे येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांच्या वतीने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले. यामध्ये ट्रॅक्टर ट्रॉली व बैलगाड्या यांचा समावेश होता.
ऊस वाहतूक करत असताना रोडवर वाहने लावू नयेत ,मोठ्या आवाजाने वाहनांमध्ये स्पीकर लावू नयेत, लहान मुलांना वाहन चालवण्यास देऊ नयेत अशा सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचना निरीक्षक किशोर शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिल्या.
यावेळी करवीर पोलीस ठाण्याचे सुशांत धनवडे,प्रमोद पाटील, ट्रॅफिक पोलीस हवालदार गणपत पोवार, सौमित्र पोवार,
कारखाण्याचे केनयार्ड सुपरवायझर संतोष देसाई, असिस्टंट सुपरवायझर अर्जुन मोरे, नामदेव वांद्रे,वाहतूक संघटनेचे दत्तात्रय पाटील,अशोक पाटील, निवास जरग आदी उपस्थित होते.