Saturday, June 14, 2025
Google search engine
Homecrimeकरणी प्रकरण; महिला पोलीस कॉन्स्टेबलला अटक..

करणी प्रकरण; महिला पोलीस कॉन्स्टेबलला अटक..

कोल्हापुर-  वेगवेगळी कारण पुढ़े करून तुमच्या घरावर करणी केली असून त्यामुळे तुम्हाला कोणत्याच कामात यश मिळत नाही,तसेच मुलाचे लग्न ठरत नाही. घरातील अघोरी शक्तींना नायनाट करण्याचे आमिष दाखवून नऊ जणांनी वृध्दास ८४ लाख रुपयांना गंडा घातला होता. या प्रकरणातील संशयीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला पोलीस कॉन्स्टेबल तृप्ती संजय मुळीक (वय ३२ रा. कुडाळ, सिधुदूर्ग) हिला बुधवारी जुना राजवाडा पोलीसांनी अटक केली.

हा प्रकार १३ फेब्रुवारी,२०२३ ते ८ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान घडला होता.यातील  फिर्यादी सुभाष हरी कुलकर्णी (वय ७७ रा. दत्त गल्ली,गंगावेश कोल्हापूर) यांच्या घरात संशयीत दादा पाटील महाराज-पाटणकर, आण्णा उर्फ नित्यानंद  नारायण नायक, सोनाली पाटील उर्फ धनश्री काळभोर, गोळे, कुंडलिक झगडे, पोलीस कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक, ओंकार, भरत, हरीष अशा नऊ जणांनी येऊन तुमच्या घरात अघोरी शक्ती असल्याने तुमची प्रगती होत नसल्याचे सांगून त्यांना वेगवेगळ्या पध्दतीने पुजा करऱ्यासाठी सोन्याच्या मुर्ती,नाग असे दागिने करून आणण्यास सांगितले. ८४ लाख रुपयांची फसवणूक केली.
  आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुलकर्णी यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलीसांनी गुन्हा दाखल करून पहिल्या टप्प्यात दोघांना अटक केली. या गुन्हयात सिधुदूर्ग पोलीस दलातील एका महिला कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचे समजताच  पोलीसांनी बुधवारी तृप्ती मुळीक हिला अटक केली.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News