बालिंगा/मोहन कांबळे: या निवडणुकीत जरी पराभव पत्करावा लागला असला तरी निवडणूक अटीतटीची झाली हजारो करवीरवासीय यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मतदान केलं त्यांचा मी सदैव ऋणी राहीन, तसेच आगामी काळात करवीरच्या जनतेसाठी स्वर्गीय आमदार पी.एन.पाटील साहेबांनी दाखवलेल्या वाटेवर चालण्याचा निर्धार राहील असे यावेळी राहुल पाटील म्हणाले.
आज बुधवार फुलेवाडी बालिंगा रोड जवळील अमृत मल्टीपर्पज हॉल येथे काँग्रेसमार्फत स्वर्गीय आमदार पी.एन पाटी साहेब यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी राहुल पाटील यांच्या समर्थनार्थ चिंतन मेळावा आयोजित केलेला होता , त्या वेळी बोलताना राहुल पाटील म्हणाले की, निवडणुकीत जरी पराभव पत्करावा लागला असला तरी निवडणूक अटीतटीची झाली असुन येथुन पुढे मी सदैव करवीर, पन्हाळा व बावड्यांचे लोकांशी सतत संपर्कात राहुन अडीअडचणीला धावुन येणार असे आश्वासन दिले, आणि पराभवाने खचुन गेलो नसुन दुस-या दिवसांपासून मी जनतेच्या सेवेसाठी सुरवात केली असुन तुम्हीही खचुन जावु नका , असेही ते पुढे कार्यकर्त्यांना संबोधित करतांना म्हणाले.
सदर मेळाव्यासाठी करवीर गगनबावडा व पन्हाळा तालुक्यातून हजारो कार्यकर्ते आज एकत्रित चिंतन मेळाव्यामध्ये सहभागी झाले होते.
या चिंतन मेळाव्यामध्ये अनेक वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करून आजही लोकांना आपला झालेला पराभव मान्य नाही त्यांना आजही वाटते की विजय आपलाच आहे आणि ते खरे सुद्धा आहे अश्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी आमदार पी.एन पाटील यांचे सर्व कार्यकर्ते नागरिक तसेच महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
त्याचबरोबर गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे,चेतन नरके,डी.जी.भास्कर, पुंडलिक कारंडे, युवराज पाटील, दादु मामा कामीरे, राजेंद्र सूर्यवंशी, अमर पाटील,बाजार समितीचे माजी संचालक संभाजी पाटील,शंकर पाटील उपस्थित होते.