सांगरूळ / वार्ताहर:
त्यांनी दहावीची परीक्षा दिली .त्यानंतर प्रत्येकाच्या शिक्षणातील वेगवेगळ्या वाटा . कोणी डॉक्टर,शिक्षक तर कोणी व्यवसायिक क्षेत्रात कार्यरत . काहीं मुलींचे तर दहावीनंतर परीक्षा होताच विवाह झालेत आणि गृहीणीची जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली . बघता बघता दिवस सरले .सर्वजणी आपापल्या संसारिक व नोकरी व्यावसायात व मुलाबाळात नातवंडात रमूण गेल्या . पाच वर्षांपूर्वी मोजक्या वर्गमैत्रिणी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आल्या आणि त्यांनी सर्व वर्गमैत्रिणींचा शोध घेत एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मुलींच्या दृष्टीने हे दिव्य होते कारण विवाहानंतर शाळा शिकलेल्या गावात सासर असणाऱ्या मुलींची संख्या फारच नगण्य असते .वेगवेगळ्या गावात असलेल्या वर्गमैत्रिणींचे माहेरातील नातलगाकडून फोन नंबर घेत त्यांना व्हाट्सअप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले .
इतरांचे होणारे स्नेह मेळावे पाहून आपल्या बॅचचा सुद्धा स्नेह मेळावा घ्यावा ही कल्पना यातील काही वर्ग मैत्रिणीच्या मनात आली आणी तब्बल ३० वर्षानंतर त्यांच्यातील मित्रत्व जागे झाले .एकमेकीला संपर्क करत स्नेह मेळावा आयोजित करत गुरुजनासह एकत्र आल्या . आणि शालेय जीवनातील आठवणीत रमूण गेल्या . निमित्त होते गर्ल्स हायस्कूल खुपिरेच्या मार्च १९९५ – ९६ च्या बॅचच्या स्नेहमेळाव्याचे .
. यासाठी बॅचला शिकवणारे तत्कालीन गुरुजनाना सन्मानाने निमंत्रित करून त्यांच्या प्रति असणारी कृतज्ञता व्यक्त केली होती . यावेळी प्राथमिक शाळेतील अध्यापिका छाया शिवाजी पाटील गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका एस एन मगदूम अध्यापक पी एस अतिग्रे एस एस हराळे अध्यापिका
पी ए पाटील बाजीराव विशेष म्हणजे बऱ्याच दिवसांनी मैत्रिणी एकत्र येणार असल्याने बॅच मधील सर्वजणी उस्फूर्तपणे उपस्थित होत्या .त्यांच्या चेहऱ्यावर बऱ्याच दिवसांनी एकत्र येण्याबद्दलचा आनंद ओसंडून वाहत होता .
यावेळी बोलताना मुख्याध्यापिका एस एन मगदूम यांनी तब्बल ३० वर्षानंतर विद्यार्थिनींनी गुरुजनांप्रती आपुलकी जपली आहे हे कौतुकास्पद आहे व आम्हा गुरुजनांना अभिमानास्पद आहे असे सांगितले .
प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका छाया पाटील म्हणाल्या १९९० ला नोकरीची सुरुवात खुपिरे प्राथमिक शाळेतून झाली यावेळी माझी ही पहिली बॅच होती . सध्याच्या आधुनिक युगात माझ्या विद्यार्थिनींनी ३५ वर्षांपूर्वीची ओळख ठेवत आपल्या आनंद उत्सवात मला सहभागी करून घेतले हे अविस्मरणीय आहे .
अध्यापक डी एस अतिग्रे, एस एस हराळे यांनी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देत शुभेच्छा दिल्या.
यानंतर उपस्थित सर्व वर्गमैत्रिणीने आपल्या शालेय जीवनातील आठवणी व सध्याचे जीवन या बद्दल मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे स्वागत मनीषा पाटील यांनी केले व प्रास्ताविक डॉ सारिका पाटील यांनी केले.आभार जयश्री पाटील यांनी मानले.