कोल्हापूर : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात कोल्हापूर जिल्ह्याला एक कॅबिनेट व एक राज्य मंत्रीपद मिळाले आहे.
यामध्ये राधानगरी विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे प्रकाश आबिटकर यांना राज्यमंत्री पद तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कॅबिनेट मंत्रीपदासाठी हसन मुश्रीफ यांना संधी मिळा ली आहे.
रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मंत्रीमंडळ स्थापनेसाठी बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारात या दोघांना रात्री उशिरा फोन आला त्यामुळे दोघांच्याही कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला दहा जागा मिळाल्या होत्या त्यामध्ये आमदार विनय कोरे ,राजेंद्र पाटील यड्रावकर, चंद्रदिप नरके ,राजेश क्षीरसागर ,अमल महाडिक हे इच्छुक होते .या सर्वांनीही आपापल्या परीने मंत्री पदासाठी प्रयत्न केले होते.
राधानगरी चे आमदार प्रकाश आबिटकरयांचे लाल दिव्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला आहे.