दिंडनेर्ली(सागर शिंदे):
अवैध व्यवसायाविरुद्ध इस्पूर्ली पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. कोल्हापूर गारगोटी रोड वरती पेट्रोल पंपासमोर सुरू असलेल्या मटका अड्यावरती धाड टाकून बुकी मालक व एजंट यांचेवरती गुन्हा दाखल केला आहे.
मुख्य रस्त्यालगत एक पत्र्याच्या शेड मध्ये मटका अड्डा सुरू होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व इस्पूर्ली पोलिसांनी धाड टाकून मटका मालक निलेश पवार (रा.इस्पूर्ली) व एजंट उत्तम बंडा चौगले (रा. दिंडनेर्ली)यांना ताब्यात घेवून गुन्हा दाखल केला आहे.त्यांच्याकडून रोख १७२५ रुपये रक्कम ताब्यात घेतली आहे.
तसेच दिंडनेर्ली फाट्यावरती कल्याण मटका घेत असताना पांडुरंग दत्तात्रय मोरे (रा.म्हाळुंगे) याला पोलिसांनी पकडले त्याच्याकडून रोख रक्कम ताब्यात घेतली आहे.
कोल्हापूर गारगोटी मार्गावरती हणबरवाडी जवळील घाटात उघड्यावरती दारू पित बसलेल्या तीघांवरती कारवाई केली आहे. निलेश रामचंद्र कापूसकर ( शिंगणापूर), नितीन बाबुराव गवळी (शिंगणापूर),संतोष सर्जेराव आडनाईक (यवलुज ) हे तिघे घाटात उघड्यवरती दारू पीत बसले होते.त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे वरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक मुदस्सर शेख यांनी पदभार घेतले पासून अवैध व्यवसाय विरोधात कडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.त्यांच्या या कारवाईचे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
इस्पूर्ली पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारच्या अवैध व्यवसाय,गुंडगिरी, बेकायदेशीर दारू विक्री आदी विरोधात कडक कारवाई केली जाणार.कोणाचीही हयगय केली जाणार नाही.
मुदस्सर शेख
सहाय्यक पोलीस निरीक्षक मुदस्सर शेख