कोल्हापूर:
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या तपासात एका घरपोडी करणाऱ्या व्यक्तीस अटक केली असून त्याच्याकडून गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरपोडीचा चोरीचा गुन्हा उघड झाला आहे त्याच्याकडून 5 लाख 52 हजार किमतीचे सोने -चांदीचे दागिने हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोल्हापुर परिसरातील चोऱ्यांचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सुरू केला आहे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकात मिळालेल्या माहितीनुसार आमजाई वरवडे तालुका राधानगरी या गावचे हद्दीत स्मशानभूमी जवळ एक चोरटा चोरीचा माल विक्रीस घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून संदीप नाना डोने वय 32 राहणार डोनेवाडी तर्फ तळगाव तालुका राधानगरी यास रंगेहात पकडले त्याच्या कब्जातील सोने चांदीचे दागिने असा 5 लाख 52 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला चौकशीअंती गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी चा गुन्हा केल्याची कबुली त्याने दिली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार संजय कुंभार , विजय इंगळे ,महेश पाटील ,सागर माने, लखन पाटील, शुभम संकपाळ, संजय पडवळ ,कृष्णात पिंगळे, अमित मर्दानी,अमित सर्जे, सुशील पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.