बालिंगा/प्रतिनिधी. बालिंगा तालुका करवीर येथील ग्रामपंचायत च्या सरपंच पदी सतेज पाटील गटाच्या सौ.राखी अजय भवड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
विद्यमान सरपंच सौ सुद्धा रंगराव वाडकर यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त होते.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनिल काटकर मंडलाधिकारी यांनी कामकाज पाहुन सौ राखी भवड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आले. या वेळी भवड यांचे समर्थक यांनी फटाक्यांची व गुलालांची आतषबाजी केली तसेच गावातून भव्य प्रमाणात शक्तिप्रदर्शन प्रदर्शन करुन भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या वेळी उपसरपंच पोर्णिमा जत्राटे, ग्रामपंचायत सदस्य पंकज कांबळे,पुजा जांभळे, सुध्दा वाडकर, नंदकुमार जांभळे,माजी सरपंच मयुर जांभळे, शशिकांत सुतार,सचिन माळी तसेच
तंटामुक्ती अध्यक्ष अनिल पोवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष मधुकर जांभळे,अमर जत्राटे, युवराज जत्राटे, राजेंद्र चौगले, विनायक कांबळे, विकास जांभळे, विजय जांभळे,रवि भवड, श्रीकांत भवड, जनार्दन जांभळे, मोहन कांबळे, भिमराव कांबळे,अजय वाडकर उपस्थित होते.