कोल्हापूर:
कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या एका पथकाने आज मोठी कारवाई करून गर्भलिंग निदान करणारे एक रॅकेट रेड हँड पकडले.
यामध्ये मोठी साखळी असून त्याचा लवकरच पर्दाफास होणार आहे.फूलेवाडी परिसरातील एका खाजगी रूग्णालयात गर्भलिंगनिदान करताना दुपारी ही कारवाई केली. यासाठी 50 हजाराची रक्कम घेताना संशयित डॉक्टरांना पकडले. श्री जोतिबा अर्थात वाडी रत्नागिरी ता. पन्हाळा येथील हे डॉक्टर असून त्यांना ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर रूग्णालयात गर्भलिंग तपासणीसाठी लागणार मोठा औषध साठा जप्त केला आहे. या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. साखळी तील अनेकांचे धाबे दणाणले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एन के पिंपळे व डॉ. मदने यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केली.