कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर-गगनबावडा मार्गाच्या दिरंगाईबद्दल चौकशी करून कंत्राटदार व अधिकारी यांच्यावर गुन्हे नोंद करावेत अशी मागणी मनसेने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. बालिंगे येथील नवीन पुलाचे काम लवकर पूर्ण व्हावे अन्यथा २७ डिसेंबर रोजी भोगावती नदीच्या पाण्यात उपोषण करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अमित पाटील, करवीर तालुका अध्यक्ष अभिजीत पाटील, यतीन होरणे, अमर कंदले, अमित बंगे, राहुल खाडे, संदीप खाडे, निलेश पाटील उपस्थित होते.