कोल्हापूर:
कोल्हापूर जिल्ह्यातील वाढते मोटरसायकल चोरीचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी खास मोहीम राबवली.
त्यानुसार मोटरसायकल चोरट्यांवर पाळक ठेवून पथके तयार केली. त्याप्रमाणे पाळक ठेऊन काही चोरटे मोरेवाडी जकात नाका येथे मोटरसायकल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून स्वप्निल आनंदा सोनाळे वय 23 राहणार मसोबा माळवाडी, गोकुळ शिरगाव
, ओमकार संजय चव्हाण वय 20 राहणार गणेश मंदिर जवळ गोकुळ शिरगाव व अंकुश लक्ष्मण पांडगळे वय 54 राहणार राजेंद्र नगर दत्त मंदिर शेजारी या तिघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून सहा मोटरसायकली व सेंटरिंगचे प्लेट्स आढळून आले. अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल करून या मोटरसायकली चोरीच्या असून वडगाव उजळाईवाडी गोकुळ शिरगाव या परिसरातून चोरून आणल्याचे सांगितले. या सहा मोटरसायकलींसह त्यांच्याकडून सेंट्रींग प्लेटा पोलिसांनी ताब्यात घेतल्या. त्याची किंमत सुमारे पाच लाख 50 हजार रुपये इतकी आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे,पोलीस उपनिरीक्षक जालींदर जाधव, वैभव पाटील,प्रवीण पाटील,विशाल खराडे, योगेश गोसावी, संतोष बरगे ,गजानन गुरव,प्रदीप पाटील,परशुराम गुजरे,संदीप बेंद्रे,लखन पाटील आदींनी ही कामगिरी बजावली.