Wednesday, June 18, 2025
Google search engine
HomeEducationडी. वाय.पाटील इंजिनीअरिंग कॉलेज, साळोखेनगर येथे 'सतेज मॅथ्स स्कॉलर' परिक्षा उत्साहात; ३...

डी. वाय.पाटील इंजिनीअरिंग कॉलेज, साळोखेनगर येथे ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परिक्षा उत्साहात; ३ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

कोल्हापूर : साळोखेनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सतेज मॅथ्स स्कॉलर परिक्षा उत्साहात संपन्न झाली. राधानगरी, गारगोटी, पन्हाळा, कागल,शाहुवाडी,गडहिंग्लज,आजरा,चंदगड, भुदरगड ,इचलकरंजी तसेच कोल्हापूर शहरातील तसेच जिल्ह्यातून बारावी विज्ञान शाखेतील 110 महविद्यालयांमधून 3085 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.

गणितातील प्रतिभावंत श्रीनिवास रामानुजन यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून संस्थेचे उपाध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून गेल्या सहा वर्षांपासून ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती दूर करून या विषयाची आवड निर्माण व्हावी व पुढील परीक्षांचा उत्तम पाया रचला जावा यासाठी हि परीक्षा घेतली जाते. रविवार 22 डिसेंबर रोजी ही परीक्षा संपन्न झाली. परीक्षेसाठी संपूर्ण जिल्ह्यातून विद्यार्थ्यांना नेण्या-आणण्याच्या सुविधे सोबत भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.

या परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेनंतर होणाऱ्या एमएचटी-सीईटी (MHT-CET) क्रॅश कोर्सला सहभाग नोंदवण्यासाठी सुलभ होणार आहे. त्याचबरोबर बारावी बोर्ड व सीईटी (CET) व जेईई (JEE) परीक्षेसाठीसुद्धा हा अनुभव उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थ्यांना परिक्षेनंतर आयआयटी (IIT) च्या तज्ञ प्राध्यापकांकडून मार्गदर्शन करण्यात आले व गणित विषयाला उपयुक्त अशा नोट्स देण्यात आल्या.
परीक्षेतील प्रश्नांमधील विविधता, परीक्षेची काठीण्यपातळी व परीक्षेचा आयोजनाबद्दल विध्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेदिवशी महाविद्यालयामध्ये थेट नाव नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आली.
डी वाय पी ग्रुप चे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी परिक्षास्थळी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच सायन्स कॉलेज प्रतिनिधींशी संवाद साधून उपक्रमाला सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.
या उपक्रमाला संस्थचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, तेजस पाटील, कार्यकारी संचालक डॉ.अनिलकुमार गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले. कॅम्पस संचालक डॉ.अभिजीत माने,प्राचार्य डॉ. सुरेश डी. माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. सर्व ऍडमिशन समन्वयक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News