Monday, June 23, 2025
Google search engine
HomeAgricultureडॉ. डी. वाय. पाटील बी. टेक. ऍग्रीचा विद्यार्थी कृषी शास्त्रज्ञ

डॉ. डी. वाय. पाटील बी. टेक. ऍग्रीचा विद्यार्थी कृषी शास्त्रज्ञ

कोल्हापूर:
डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदेचे माजी विद्यार्थी डॉ. रोहित नलावडे यांची केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयात कृषी शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषद या संस्थेच्या अंतर्गत कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमधून त्यांची निवड करण्यात आली आहे. या परीक्षेतून निवडले जाणारे उमेदवार देशाच्या कृषी संशोधन आणि विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. डॉ. रोहित नलावडे यांनी डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातून बी.टेक. (ऍग्री) ची पदवी, तसेच डॉ. महाराणा प्रताप कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ, उदयपूर- राजस्थान येथून एम. टेक. व केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था, भोपाळ येथून पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. डॉ. रोहीत हे आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीय, शिक्षक आणि मित्रांना देतात. डी. वाय. पाटील बी. टेक. (ऍग्री) महाविद्यालयामधील विद्यार्थीदशेतील स्पर्धा परीक्षेसाठीचे पोषक वातावरण आणि व्यवस्थापनाचा अनुभव हा खूप उपयोगी पडला असे ते आवर्जून सांगतात. कठोर परिश्रम, नियोजनबद्ध अभ्यास आणि सकारात्मक विचारसरणी यामुळे चांगले यश मिळवता आल्याचे त्यांनी सांगितले. कृषी अभियंता म्हणून आपल्या कारकिर्दीत नवनवीन संशोधन करून भारतीय कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्याचा डॉ. रोहित नलावडे यांचा मानस आहे.
प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील म्हणाले, डॉ. रोहित यांनी या परीक्षेत मिळवलेले यश हे महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा दाखला आहे. त्यांचे हे यश महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तसेच या महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी.पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता यांनी डॉ. रोहित यांचे अभिनंदन करून त्यांना उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News