Wednesday, June 18, 2025
Google search engine
HomeSocialइंडिया आघाडीच्या वतीने कोल्हापूर ते माणगाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान बाईक रॅली..

इंडिया आघाडीच्या वतीने कोल्हापूर ते माणगाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान बाईक रॅली..

कोल्हापूर-  संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अवमानकारक जे वक्तव्य केलेले होते,त्याचा निषेध दिनांक 22 डिसेंबर रोजी बिंदू चौक येथे धरणे आंदोलन करून व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन कार्यक्रम करून करण्यात आलेला होता. त्यावेळेस रविवार दिनांक 29 डिसेंबर रोजी शाहू महाराज पुतळा दसरा चौक कोल्हापूर ते माणगाव अशी दोन हजार मोटारसायकलींची रॅली काढण्याचे घोषित करण्यात आलेले होते. या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान बाईक रॅलीच्या तयारीसाठी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये बैठक संपन्न झाली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी निमंत्रक आर.के. पवार हे होते. आर के पवार यांनी खासदार शाहू महाराज छत्रपती व काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज ऊर्फ बंटी डी . पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही भव्य रॅली काढणार असल्याचे सांगितले. या बैठकीमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य संसदेत केले,त्या दुष्ट प्रवृत्तीचा निषेध करण्याची आवश्यकता या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या विविध मान्यवरांनी केली. या सन्मान रॅलीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख्येने मोटारसायकली सामील झाल्या पाहिजेत ,त्या दृष्टीने लोकसंपर्क वाढवून प्रयत्न करण्याचे ठरले. इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांनी आपल्या पक्षातून जास्तीत जास्त संख्येने मोटारसायकली सामील होतील याची जबाबदारी घेतली. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील संविधान प्रेमी सर्व आम जनतेने दसरा चौक कोल्हापूर येथे रविवार दिनांक 29 डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ 09:30 वाजता मोटार सायकली सह उपस्थित रहावे असे आवाहन इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात आले. या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान रॅलीची जागृती होण्यासाठी शंभर डिजिटल बोर्ड विविध चौका- चौकात लावण्याचे ठरले. या रॅलीमध्ये मार्गावरील सर्व गावातील नागरिक देखील सामील होणार आहेत. शाहू महाराज पुतळा दसरा चौक इथून निघालेल्या रॅलीचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माणगाव येथे अभिवादन करून करण्यात येणार आहे. रॅलीच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 11 फूट उंचीचा पुतळा असणार आहे. माणगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करणारा ठराव मांडून या रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे. तरी या रॅली मध्ये संविधान प्रेमी , डॉक्टर आंबेडकर प्रेमी, लोकशाहीवादी आम जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे.असे आवाहन इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात आले. या बैठकीला विजय देवणे, सचिन चव्हाण, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, कॉ . दिलीप पवार, कॉम्रेड उदय नारकर,सुनील मोदी, व्यंकाप्पा भोसले, कॉ सुभाष जाधव, डी.जी. भास्कर चंद्रकांत यादव, दिगंबर लोहार, अनिल घाटगे, सुभाष देसाई, दुर्वासबापू कदम, भरत रसाळे, सुभाष बुचडे, मोहन सालपे, विशाल देवकुळे, मंजीत माने, संभाजी जगदाळे, दिलदार मुजावर,अरुण कदम, रंगराव देवणे, आकाश शेलार, रणजीत पवार,बबन शिंदे, बाळासाहेब भोसले आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News