Friday, January 16, 2026
Google search engine
HomeSocialबहुजन समाजास न्याय द्यावा ; इस्पूर्ली परिसरातील बहुजन समाजाची मागणी

बहुजन समाजास न्याय द्यावा ; इस्पूर्ली परिसरातील बहुजन समाजाची मागणी

दिंडनेर्ली  (सागर शिंदे):
परभणी येथील बहुजन समाज संविधानिक मार्गाने आंदोलन करीत असताना पोलिसांनी हिंसाचार केला असून सोमनाथ सुर्यवंशी याला पोलीस कोठडीत जबर मारहाण केल्यानेच त्याचा मृत्यू झाला असून येस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना वरती कडक कारवाई करून बहुजन समाजास न्याय द्यावा असे निवेदन इस्पूर्ली परिसरातील बहुजन समाजाच्या वतीने इस्पूर्ली पोलिसांना देण्यात आले.
पोलिसांच्या मारहाणीत सूर्यवंशी कुटुंबीयांचा आधारवड गेल्याने कुटुंबाला आर्थिक भरपाई देऊन एका व्यक्तीला शासकीय सेवेत घ्यावे अशी मागणी करण्यात आली.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केलेबद्दल त्यांनी आपल्या संविधानिक पदाचा राजीनामा देऊन समस्त भारतीय बहुजन समाजाची माफी मागावी अशी ही मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
याप्रसंगी ब्राईट आर्मी जिल्हाध्यक्ष समीर घारे,बाबासो कांबळे निगवेकर,शाहीर उदय भोसले सर, तुषार कांबळे ,शहाजी कांबळे, अमोल कांबळे, प्रेमजीत कांबळे, विकास कांबळे ,सचिन कांबळे, उत्तम कांबळे, दीपक कांबळे, आदर्श कांबळे, दगडू कांबळे, धनाजी कांबळे ,पारस कांबळे ,दत्तात्रय कांबळे, बबन कांबळे, अक्षय कांबळे, ऋषिकेश कांबळे ,दीपक भोसले, संग्राम कांबळे, तेजस कांबळे, सचिन कदम, प्रथमेश कांबळे यांच्यासह अनेक भीमसैनिक उपस्थित होते यांच्यासह यांच्यासह दिंडनेर्ली, इस्पूर्ली, निगवे,गिरगाव,नागाव, चुये,कुर्डू, येवती,कावणे,चंद्रे,बेले,म्हाळुंगे, नंदगाव, वडकशिवाले आदी गावचे भीमसैनिक उपस्थित होते.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News