कोल्हापूर: दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी हुतात्मा पार्क येथे जयंती नाल्यात जेसीबीने गाय काढत असताना एक पुरुष जातीचे डोके नसलेले धड सडलेल्या अवस्थेतील (अंदाजे वय -35 ) जेसीबी चालकाला दिसले होते.
त्यावरून जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. धडा डोके नसल्याने तसेच अंगावर कपडे नसल्याने धड चढलेल्या अवस्था असल्याने त्याची ओळख पटली नव्हती तसेच नाल्यातील गाळ काढतेवेळी जेसीबी मुळे मृतदेहाचे डोके कट झाले असावे असा प्राथमिक अंदाज होता .त्यावेळी मयताच्या डोक्याचे धड नाला शोधूनही सापडले नव्हते. परंतु शिवविच्छेदन अहवालामध्ये शार्प कट असा डॉक्टरांचा अभिप्राय आल्याने त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सदर मयताचा तपास करणे बाबत आदेश दिले होते.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दोन पथके नियुक्त करून त्यांना सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार तपास करत असताना पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मिसिंग व्यक्तींची माहिती घेऊन धडाचे अंगावरील फक्त अंडरवेअरचे कंपनी वरून नातेवाईकांचा शोध घेतला असता सदर मयत व्यक्ती अशोक पाटील राहणार पिशवी तालुका शाहुवाडी अशी असल्याची माहिती मिळाली. मृताचे नातेवाईकांच्याकडे तपास केला परंतु सदर मृताचा कोणी घातपात केला याबाबत कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झाली नाही. परंतु पथकाने तपासामध्ये सातत्य ठेवून धड सापडलेल्या परिसरामध्ये साध्या वेशात वावर ठेवून गुप्तपणे माहिती काढत असताना डवरी वसाहत मधील रावण उर्फ अजय शिंदे व त्याचे दोन मेहुणे तसेच त्याचे इतर साथीदार यांनी हुतात्मा पार्क मध्ये एका व्यक्तीचा खून करून त्याचे मुंडके कापून धड नाल्यामध्ये टाकले व मुंडके गाळामध्ये पुरले आहे अशी गोपनीय बातमी मिळाली. त्यानुसार पथकातील अधिकारी , अंमलदार, पोलीस निरीक्षक कळमकर यांनी तत्काळ आरोपींची माहिती घेण्याचे काम सुरू केले त्यावेळी त्यांना असे समजले की ज्या दिवशी मृताचे धड मिळून आले त्याच दिवशी दिनांक 04 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी पाच वाजता चे सुमारास रंकाळा चौपाटी येथे रावण उर्फ अजय शिंदे याचा निर्घृण खून झाला होता. त्यानंतर रावण उर्फ अजय शिंदे यांचे मेहुणे व इतर साथीदार यांचा नेहमी वावर कोठे असतो ते कोठे राहतात कोठे काम करतात याची पथकाने गोपनीय रित्या माहिती घेऊन त्यांना एकाच वेळी रत्नागिरी, डवरी वसाहत, कळंबा येथून ताब्यात घेऊन त्यांना वेगवेगळे ठेवून त्यांच्याकडून तपास केला त्यानंतर सदर प्रकरणाशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे प्रथम त्यांनी सांगितले.
आरोपी खोटे बोलत असून पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे लक्षात आल्याने आरोपींना पुन्हा विश्वासात घेऊन त्यांच्याकडे तपास सुरू केला असता आरोपींनी संगनमताने खुनाचा गुन्हा केल्याची कबुली देऊन त्यातील अतुल शिंदे यांनी अशी माहिती दिली की रावण उर्फ अजय शिंदे याचा खून होण्याचे आधी 15 दिवसांपूर्वी अभिषेक शिंदे हा रात्रीच्या वेळी हुतात्मा पार्क गार्डनमध्ये बसला होता त्यावेळी अभिषेक व मयत अशोक पाटील या व्यक्तींचा किरकोळ कारणावरून वाद झाला त्यावेळी अभिषेकने आकाश ,अजित उर्फ रावण ,अतुल शिंदे ,सुरज माळी व ओंकार माने यांना बोलावून मयत व्यक्तीच्या मानेवर एडक्याने वार करून ठार केले त्यानंतर मृतदेह उचलून नाल्यामध्ये नेऊन मताची ओळख पटू नये तसेच आपण पकडले जाऊ नये म्हणून नाल्यातच त्याचे मुंडके एडक्याने कापून त्याचे अंगावरील कपडे काढून नाल्यात फेकली धड पुलाचे खाली नाल्यात टाकले व मुंडके तिथूनच काही अंतरावर नाल्याचे कडेला गाळात पुरून पुरावा नष्ट करून तेथून निघून गेले त्यानंतर काही दिवसात फरारी झाले.
सदरची कामगिरी स्थानी क गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर ,सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलिस अंमलदार परशुराम गुजरे, वैभव पाटील विशाल खराडे ,गजानन गुरव ,योगेश गोसावी प्रवीण पाटील संतोष बरगे, महिंद्र कोरवी, प्रदीप पाटील, कृष्णात पिंगळे आदींनी केली. आठ महिन्यापूर्वी झालेले या कुणाची उकल उघडण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.