Sunday, December 7, 2025
Google search engine
HomeSocialस्वामी पालखीचे करवीरमध्ये स्वागत ;सोमवारपासून पादूकांचे दर्शनासाठी शहरात वास्तव्य

स्वामी पालखीचे करवीरमध्ये स्वागत ;सोमवारपासून पादूकांचे दर्शनासाठी शहरात वास्तव्य

प्रयाग चिखली वार्ताहर:
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी- पादुकांचे करवीर तालुक्यामध्ये आगमन झाले असून पन्हाळा तालुक्यातील करवीर मध्ये आलेल्या पादुकांचे प्रथमच रविवारी रजपुतवाडी येथे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले सोमवार.(दि.30) ते गुरुवार पर्यंत कोल्हापूर शहरात मुक्कामी राहणार आहे रजपुतवाडी येथे पालखी संयोजक संतोष भोसले तसेच पुजारी संजय कुलकर्णी , रंजना स्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार भक्तांनी दर्शन घेतले यावेळी महाप्रसादाचे नियोजन रजपूतवाडीचे सयाजी पाटील, प्रदीप शिंदे, विनोद पाटील यांनी केले.
दुपारी चार वाजता पालखी निगवे गावी मुक्कामी गेली. या ठिकाणीही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती
समर्थांच्या पालखी पादुका सोमवारी सकाळी नऊ वाजता फुलेवाडी येथे दुपारी बारा वाजता हनमंतवाडी येथे चार वाजता चंबुखडी मातोश्री वृद्धाश्रम येथे तर सायंकाळी सहा वाजता दसरा चौक कोल्हापूर येथे आगमन होणार आहे त्यानंतर पालखी पादुका कोल्हापुरातील ठीक ठिकाणी भ्रमण होऊन रात्रीच्या विसाव्यासाठी मंगळवार पेठत निवासस्थानी जाणार आहे
स्वामींची पालखी पादुका सोमवार ते गुरुवार कोल्हापूर शहरांमध्ये ठिकठिकाणी दर्शनासाठी उपलब्ध राहणार आहे.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News