Thursday, June 19, 2025
Google search engine
HomeEnvironmentमुंबईतील हवेचा दर्जा खालावला.!

मुंबईतील हवेचा दर्जा खालावला.!

मुंबई :गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा सातत्याने खालावत चालल्याचं दिसून येतंय. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर देखील गंभीर परिणाम होत आहेत. मुंबईचा हवा निर्देशांक सध्या 104 इतका नोंदवण्यात आला आहे, जो सामान्यत:100 च्या खाली असणे अपेक्षित असतो. यावर आता बृहन्मुंबई महानगरपालिकाने (BMC) कठोर पाऊले उचलण्याचा निर्णय घेतलाय. 
गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईत

ठिकठिकाणी अंशत: ढगाळ वातावरण दिसत आहे, ज्यामुळे हवेच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. हवेचा निर्देशांक 104 असल्याने नागरिकांना श्वास घेण्यास अडचणी येत आहेत. विशेषत: हृदय आणि श्वसन संबंधित आजारांच्या रुग्णांसाठी ही परिस्थिती अधिक गंभीर आहे. ((Mumbai News))

मुंबई महापालिका उचलणार कठोर पाऊल-

BMC ने हवा प्रदूषण नियंत्रणासाठी युद्ध पातळीवर काम सुरू केले आहे. महापालिकेच्या सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये विशेष कारवाई सुरू आहे. वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणार्‍या 28 बांधकाम स्थळांना चेतावणी देण्यात आली आहे. या स्थळांवर धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
BMC ने बांधकाम स्थळांवर धूळ नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई महापालिकेकडून सातत्याने रस्त्यांवर पाणी फवारणी केली जात आहे. दरम्यान, मुंबईत हवा निर्देशांक 104 इतका असल्याची नोंद झाली असून काही भागात हवेचा निर्देशांक अतिवाईट स्थितीत नोंदवण्यात आलाय. कुलाबा, मालाड, कुर्ला, भांडुप, देवनार, बोरिवली, वांद्रे पूर्व या ठिकाणच्या हवेची गुणवत्ता अतिवाईट स्थितीत असल्याचे समोर आलंय. तसेच छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, जुहू, महापे, नेरुळ या ठिकाणी देखील हवेची गुणवत्ता वाईट आढळून आली आहे.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News