Monday, November 10, 2025
Google search engine
HomePOLITICALआगामी काळात ‘करवीर’मध्ये महायुती ताकदीने निवडणूका लढवणार : आम.चंद्रदीप नरके

आगामी काळात ‘करवीर’मध्ये महायुती ताकदीने निवडणूका लढवणार : आम.चंद्रदीप नरके

बालिंगे : करवीर राष्ट्रवादी तर्फे नरके यांचा सत्कार
कोल्हापूर : विधानसभा निवडणूकीत ‘करवीर’मध्ये राष्ट्रवादी कॉग्रेससह महायुतीतील सर्वचमित्रपक्षांनी ताकदीने मदत केल्यानेच माझा विजयी झाला. याची जाणीव ठेवून आगामी पाच
वर्षात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचे काम माझ्याकडून होईलच त्याचबरोबर जिल्हा
परिषदेसह सर्व निवडणूका महायुती एकत्रीतपणे ताकदीने लढवणार आहे. असे पतिपादन
‘करवीर’चे नवनिर्वाचित आमदार चंद्रदीप नरके यांनी केले.
करवीर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने आमदार नरके यांचा सत्कार आयोजित केला होता. त्यावेळी
ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधूकर जांभळे होते. आमदार नरके
यांचा सत्कार मधूकर जांभळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नरके म्हणाले, महायुती सरकारने मागील अडीच वर्षात केलेल्या कामाची
पोहचपावती मतदारांनी दिली आहे. ‘करवीर’च्या जनतेला आपणावर मोठा विश्वास दाखवल असून त्याच पात्र राहून पाच वर्षे काम करु. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी हाडाचे काडे आणि
रक्ताचे पाणी करुन मला निवडून आणले.
मधूकर जांभळे म्हणाले, राष्ट्‍वादी कॉग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने आदेश देईल, त्यानुसार मागील
विधानसभा निवडणूकीत काम केले. यावेळेला चंद्रदीप नरके यांना आमदार करणारच या इर्षेने
आम्ही प्रचारात तुटून पडलो. भविष्यातील राजकारणाची तमा न बाळगता प्रामाणिकपणे काम
केले. त्यामुळे आगामी काळात शिवसेना व राष्ट्‍वादी कॉग्रेस ‘करवीर’मध्ये हातात हात घालून
काम करेल, एवढी ग्वाही आमदार चंद्रदीप नरके यांच्या वतीने देत आहोत.तालुकाध्यक्ष शिवाजी देसाई यांनी स्वागत केले. देवबा पाटील (कुर्डू), नामदेव परीट (वडणगे),
राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष अरविंद कारंडे यांनी मनोगत व्यक्त केले. करवीर विधानसभा
अध्यक्ष संभाजी पाटील, महिला तालुकाध्यक्ष सविता खाडे, सोशल मिडियाचे जिल्हाध्यक्ष युवराज पाटील, दिलीप सावंत, अमर पारमीत, संदीप एकशिंगे, संदीप कांबळे, वसंत पाटील, अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष बाबूराव जांभळे, सुरेश बागडे, रघूनाथ फराकटे, संजय शिपुगडे, सदाशिव पाटील,अमर अणकर,राहुल माने, आकाश सुतार आदी उपस्थति होते. भटक्या विमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष कृष्णात पुजारी यांनी आभार मानले.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News