पुणे : फरार वाल्मिक कराड अखेर आज (मंगळवार) पुण्यातील CID मुख्यालयात शरण आले आहेत. आपल्याविरोधात खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केल्याचा दावा त्यांनी केला आहे. राजकीय उद्देशाने माझं नाव जोडलं जातंय असे ते म्हणाले. मला अटक करण्यापूर्वी जामिनाचा अधिकार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पोलिसांना शरण येण्याआधी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या परिसरात आधीपासूनच वाल्मिक कराड यांचे समर्थक थांबलेले होते. त्यावरून आजच वाल्मिक कराड हे पोलिसांना शरण येणार होते या विषयी कार्यकर्त्यांना माहिती होती. दरम्यान कराड हे शरण आल्यावर त्यांना CID मुख्यालयात नेण्यात आले असून, अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाशी सबंध जोडला जात असलेल्या खंडणी प्रकरणातील फरार संशयित आरोपी वाल्मीक कराड यांचा पोलिसांकडून तपास सुरू होता. याप्रकरणी त्यांच्या पत्नी मंजीली वाल्मीक कराड यांचीही (दि.२९) रोजी केज पोलिस ठाण्यात चौकशी करण्यात आली होती