गडचिरोली : गडचिरोली जिल्हाच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना मोठं विधान केलं आहे. 75 वर्षानंतर अहेरी-गर्देवाडा बस सुरु झाली असून फडणवीसांनी याचं उद्घाटनं केलं. यावेळी फडणवीस म्हणाले, “मला विशेष आनंद आहे की, कोनसरीचा हा प्रकल्प ज्याचं भूमिपूजन मी मुख्यमंत्री असताना केलं होतं. आता त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन करत आहे. अनेक प्रकल्पांचं उद्घाटन भूमिपूजन होत आहे. दहा हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. काम पूर्ण झाल्यानंतर दहा महिन्यानंतर पाच हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, ते आपल्याला पाहायला मिळत आहे”
आज दौरा हा अतिशय विशेष आहे. 75 वर्षानंतर अहेरी-गर्देवाडा बस चालू झाली आहे. त्याचं उद्घाटन मी केलेलं आहे. पेनगुंड्याला नवीन आऊटपोस्ट तयार करून गडचिरोली जिल्ह्याची सगळी कनेक्टिव्हीटी छत्तीसगडशी करायची आहे, त्याचं कामदेखील सुरु केलेलं आहे. ज्या भागात माओवाद्यांचा मोठ्या प्रमाणात वर्चस्व होतं, आता तिथे आपलं वर्चस्व तयार झालं आहे. लोकांनी माओवाद्यांना नाकारलं आहे.
12 गावांनी ठराव करून माओवाद्यांना राशन पाणी नाकारलं. त्यांनी जे आयईडी लावले आहेत, ते सर्व पोलिसांकडे जमा केले आहेत. त्यामुळे एक नवीन पहाट गडचिरोली जिल्ह्यात तयारी झाली आहे. मी सांगायचो की याला महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा समजू नका. हे महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे. हा पहिला जिल्हा आहे”, अशी मोठी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.