कोल्हापूर : 31 डिसेंबर रोजी सरत्या वर्षाचा निरोप व 1 जानेवारी नवीन वर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्त व इतर महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय तर्फे 50 ठिकाणी नाकाबंदी व ब्रेथ अनालायझर ठेवून लक्ष ठेवण्यात आले होते . दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या अशा 316 हुल्लडबाजांवर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली आहे.
यामध्ये दारू पिऊन वाहन चालवणारे 316 ,ट्रिपल सीट 237 ,नंबर प्लेट नसणे 32 ,विना सीट बेल्ट 2, वनवे तोडणे कारवाई 21 , मोबाईलचा वापर करणे 13, सिग्नल तोडणे 4, ज्यादा प्रवासी वाहतूक करणे 9, लायसन्स संबंधी 31, उघड्यावर दारू पिणे 5, इतर कारवाई 538 ,बीपी ऍक्ट 20 असे एकूण 1328 वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यामध्ये दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांचे लायसन्स रद्द करणेबाबत आरटीओ कार्यालयाला कळविण्यात आले आहे.