मुंबई: भारत सरकारकडून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा गुरुवार 2 जानेवारी रोजी करण्यात आलेली आहे. यात 2024 मध्ये खेळरत्न, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार इत्यादींनी गौरवण्यात येणाऱ्या खेळाडूंची नावं समोर आली आहेत. यंदा खेळरत्न पुरस्कार 4 खेळाडूंना मिळाला असून अर्जुन अवॉर्ड यंदा 32 खेळाडूंना जाहीर करण्यात आलेला आहे. यात महाराष्ट्राचा स्वप्नील कुसळे, मुरलीकांत पेटकर, सचिन खिलारी यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वप्नील कुसळे यांना 2024 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत भारताला कांस्य पदक जिंकवून दिले होते. तर स्वप्नील सह त्याची प्रशिक्षक दिपाली देशपांडे हिला देखील द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
खेळ रत्न हा भारत सरकारकडून जाहीर करण्यात येणाऱ्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोश्रेष्ठ अवॉर्ड पैकी एक आहे. यंदा भारत सरकारकडून दिला जाणारा खेळरत्न अवॉर्ड नक्की कोणाला मिळणार याची उत्सुकतात होती. यंदा खेळरत्न हा 4 खेळाडूंना देण्यात आलेला असून यात मनु भाकर (शूटिंग), डी गुकेश (बुद्धीबळ). हरमनप्रीत सिंह (हॉकी), प्रविण कुमार (पॅरा ऑलम्पिक गोल्ड मेडलीस्ट) यांना जाहीर करण्यात आलेला आहे.