Saturday, December 6, 2025
Google search engine
HomePOLITICALमाजी आमदार संजय घाटगे भाजपच्या वाटेवर

माजी आमदार संजय घाटगे भाजपच्या वाटेवर

कागल: कागलचे माजी आमदार संजय घाटगे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.लवकरच ते ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकण्याची शक्यता आहे. घाटगे यांनी केलेल्या मदतीमुळेच महायुतीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार खा.शाहू महाराज यांना कागल तालुक्यातुन मताधिक्य मिळालेच आहे असे मानले जाते.तसेच नुकत्याच झालेल्या कागल  विधानसभा निवडणुकीत त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना उघड पाठिंबा दिला होता. या सर्व राजकीय परिस्थितीमुळे ते भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यांचे सोबत त्यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती व गोकुळ संचालक अमरिश घाटगे हे ही भाजपात प्रवेश करणार आहेत.लवकरच पक्ष प्रवेशही होणार आहे.मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची त्यांनी भेट घेतली असल्याचे सांगण्यात आले आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News