सांगरुळ / वार्ताहर:
जीवनधारा ब्लड बँकेचे व कोल्हापूर जिल्हा ब्लड बँक असोसिएशनचे अध्यक्ष स्वर्गीय प्रकाश घुंगुरकर यांचे जन्मदिनानिमित्त जीवनधारा ब्लड बँकेच्या वतीने उमेद फाउंडेशनला अन्नधान्य व शैक्षणिक साहित्याच्या रूपाने मदत करण्यात आली .
सांगरूळ (ता . करवीर ) येथील प्रकाश घुंगुरकर या सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या युवकांने खडतर परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून जीवनधारा ब्लड बँकेची स्थापना करत सामाजिक कार्याला सुरुवात केली .रक्तपेढीच्या माध्यमातून गरजूंना रक्तपुरवठा करण्याबरोबरच आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो या विचारातून त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम भागातील वाड्या व वस्त्या या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना विविध मार्गाने मदत करण्याचे काम केले .दरवर्षी आपला तसेच आपल्या कन्येचा वाढदिवस समाजातील वंचित घटका सोबत साजरा करत त्यांना मदत करणे .दीपावलीनिमित्त दुर्गम भागातील गोरगरीब कुटुंबांना फराळ वाटप करणे .दुर्गम भागातील मुलींना सायकल भेट देणे असे सामाजिक उपक्रम राबवत असतानाच ११ ऑक्टोबर २०२३ रोजी त्यांचे निधन झाले .
त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी जीवनधारा ब्लड बँकेच्या अध्यक्षा श्रीमती प्रीतम प्रकाश घुंगुरकर यांनी जीवनधारा ब्लड बँकेच्या माध्यमातून प्रकाश घुंगुरकर यांचे सामाजिक कार्य सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत .त्यांच्या या उपक्रमाला ब्लड बँकेचा संपूर्ण कर्मचारी वर्ग सहकार्य करत आहे .
३० डिसेंबर २०२४ रोजी स्व. प्रकाश घुंगूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त उमेद फाउंडेशच्या कोपार्डे येथील कार्यालयात शालेय मुलांसाठी जीवनधारा ब्लड बँकेच्या स्टाफच्या वतीने धान्य व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रीतम घुंगुरकर यांनी स्व.प्रकाश घुंगुरकर यांना सामाजिक कार्याची आवड होती .त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न जीवनधारा ब्लड बँकेच्या वतीने करत असल्याचे सांगितले .सुरुवातीस उमेद फाऊंडेशनचे .संस्थापक प्रकाश गाताडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले
यावेळी जीवनधारा ब्लड बँकेच्या अध्यक्ष श्रीमती प्रितम प्रकाश घुंगुरकर , प्रेलीज घुंगुरकर, तृप्ती गाडे, आसमा नदाफ, अवंती तांदूळवाडकर, सुनील कांबळे शंकर डोंगरे, संतोष हळळी,अमोल मदापघोळ, सुनील आवळे, सरिता शेरे यांचे सह उमेद फाउंडेशन चे कार्यकर्ते उपस्थित होते .