राधानगरी – ना. चंद्रकांत दादा पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्रीपदी निवड झालेबद्दल वक्रतुंड एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष व गोकुळ संचालक अभिजित तायशेटे यांचे हस्ते शाहूंची प्रतिमा,शाल व पुष्गुच्छ देवून सत्कार करणेत आला. त्याचवेळी सौ. अंजली चंद्रकांतदादा पाटील यांचे स्वागत व सत्कार संस्थेच्या सेक्रेटरी सौ. आरती तायशेटे यांचे हस्ते शाल व पुष्गुच्छ देवून करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष व गोकुळ दूध संघाचे संचालक अभिजीत तायशेटे यांनी थोडक्यात संस्थेचा 2019 पासूनचा प्रवास सांगितला. राधानगरी सारख्या दुर्गम भागातील मुला-मुलींना उच्च शिक्षणासाठी शहरी ठिकाणी जावे लागत होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण जेनेसिस हे शहरासारख्या अद्ययावत सोयीसुविधा देणार शैक्षणिक संकुल उभा केले. आज खऱ्या अर्थाने
ग्रामीण भागातील मुलींची संख्या जास्त पाहता आपला मानस पूर्णत्वास येत आहे हे पाहून समाधान वाटते असेही ते म्हणाले.
मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पालक आणि मुलींच्यावतीने सुद्धा मान. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर प्रथम वर्ष बी. फार्मसी ची विद्यार्थिनी कू. प्राजक्ता चौगले हिने आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी नामदार चंद्रकांत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले व म्हणाले की समाजामध्ये महिला सक्षमीकरण झाल्याशिवाय समाज बळकट होणार नाही.महिला उच्च शिक्षित व्हावे , स्वतःच्या पायावर उभे राहावे, त्यांच्यामध्ये संशोधन वृत्ती वाढावी हेच आमच्या सरकारचे ध्येय आहे. यासाठीच आम्ही मुलींसाठी सरसकट मोफत शिक्षण चा शासन निर्णय काढला. तसेच मुलींचा बस वाहतूक, हॉस्टेल व जेवणाचा तसेच सहलीचा खर्च असे खर्चामुळे सुध्दा पालकांवर आर्थिक ताण वाढत असतो. हा ताण कमी करण्यासाठी गरजू मुलींना कमवा व शिका ही योजना राबवणे गरजेचे आहे हे आमच्या लक्षात आले. महाराष्ट्रामध्ये एकूण 6000 महाविद्यालये आहेत त्यामुळे ही योजना राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च देखील होणार आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये या योजनेची प्रायोगिक तत्वावर सुरुवात जेनेसिस महाविद्यालयामधून करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, उद्योजक चंदवाणी, बाळासाहेब यादव, प्रदेश सचिव भाजप युवा मोर्चा अल्केश कांदळकर, भाजप उपजिल्हा अध्यक्ष संभाजी आरडे, प्रदेश सचिव अ.जा. आघाडी महाराष्ट्र राज्य दिपक शिरगावकर, कोल्हापुर नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष.मारुती
टिपुगडे ,वक्रतुंड एक्युकेशन सोसायटीचे जेष्ठ संचालक प्रकाश बोंबाडे, उपाध्यक्षा सौ. मधुरा म्हापसेकर,संचालिका कु.अवंतिका तायशेटे, सुरेश बचाटे, युवराज कुंभार, मिथुन पारकर, कुडूत्री गावचे सरपंच शिवाजी चौगले, संजय माळकर,.महेश पाटील, सुभाष पताडे, त्याचसोबत असंख्य नागरिक, जेनेसिस कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आदि उपस्थित होते
कॉलेजचे प्राचार्य डॉ. शोभराज माळवी यांनी आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन श्री. विश्वास पाटील यांनी केले.