राधानगरी – आज शनिवार दि 4 जानेवारी 2025 रोजी राज्याचे आरोग्यमंत्री नामदार प्रकाश अबिटकर यांचा गारगोटी येथे जाहीर सत्कार करण्यात आला.
टप्पा वाढीसाठी सुरू असलेल्या कोल्हापूर येथील आंदोलनात प्रकाश अबिटकर यांनी महत्वाची भूमिका बजावली होती त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनेकदा भेट घडवून आणली होती. ९ ऑक्टोबर रोजी भर पावसात गारगोटी येथे तब्बल ३ तास उभे राहून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घालून देताना,”या लोकांना आता न्याय द्यावा लागतोय” अशी आग्रही भूमिका त्यावेळी आबिटकर साहेबांनी घेतली होती. अन् दुसऱ्याच दिवशी म्हणजे १० ऑक्टोबर रोजी टप्पा वाढीचा मंत्रिमंडळ निर्णय घेतला आणि 14 ऑक्टोबर 2024 ला शासन निर्णय निघाला त्यामुळे राज्यातील 63 हजार शिक्षकांना न्याय मिळाला होता.पण हिवाळी अधिवेशनात निधी मंजूर करण्यात आला नाही.त्यामुळे सर्वदूर नाराजी पसरली होती,
येणाऱ्या अधिवेशनात लागणारा निधी धरण्यात यावा ही विनंती करण्यात आली. यासाठी आपण प्रयत्न करावा ही विनंती केली.
यावेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष शिवाजी कुरणे,केदारी मगदूम, सुभाष खामकर, अनिल ल्हायकर, शशिकांत खडके,अरविंद पाटील,नेहा भुसारी,सचिन मरळीकर,उत्तम जाधव, सुनील भांडवले,संतोष पाटील शीतल जाधव सचिन पाटील, तानाजी पाटील, मुकुंद चव्हाण, सावंता माळी, शिवाजी गायकवाड, दिग्विजय कांबळे, एस आर साळूखे जयदीप चव्हाण, अतुल पाटील तर सांगलीहून जिल्हा अध्यक्ष संदीप काळे, प्रमोद पाटील, विलास खांडेकर,दिलीप माळी इत्यादी मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.