Friday, January 16, 2026
Google search engine
HomeEducationचापेवाडीतील सामान्य कुटुंबातील आकाश काटकर यांची सीए परीक्षेत यशस्वी झेप

चापेवाडीतील सामान्य कुटुंबातील आकाश काटकर यांची सीए परीक्षेत यशस्वी झेप

कोल्हापूर:

चापेवाडी या छोट्या खेडेगावातील आकाश काटकर यांनी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या आकाश यांनी कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले.

आकाश यांचे वडील शेतकरी असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मध्यमवर्गीय होती. या कठीण परिस्थितीतही त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले. त्यांनी सुरुवातीपासूनच अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जात आत्मविश्वासाने पुढे वाटचाल केली.

आकाश यांना त्यांच्या यशासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, मात्र त्यांनी कोणत्याही परिस्थितीत हार मानली नाही. आपल्या यशाचे श्रेय ते त्यांच्या कुटुंबाला, गुरूंना आणि मित्रमंडळाला देतात. “स्वप्नं मोठी ठेवा आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा,” असे आकाश म्हणाले.

चापेवाडी गावकऱ्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी आकाश यांचे यश मोठ्या उत्साहाने साजरे केले. आकाश यांनी यशस्वीरीत्या सीएची परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे परिसरातील इतर विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत.
यासाठी त्यांना आई ,वडील ,भाऊ ,सी एस अमर पाटील व सी एस डॉक्टर कृष्णात चौगले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News