आत्तापर्यंत या व्हायरसचे रुग्ण चीनमध्ये आढळत होते. मात्र बंगळुरुतल्या आठ महिन्यांच्या बाळाला या व्हायरसने ग्रासलं आहे. या बाळाने कुठलाही प्रवास केलेला नाही. दरम्यान या घटनेबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला माहिती देण्यात आली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच अशा प्रकारच्या व्हायरसला तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. तसंच चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून आढळणाऱ्या या व्हायरसबाबत चिंता व्यक्त झाल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने बैठक बोलावली होती. दरम्यान आता भारतात आठ महिन्यांच्या बाळाच्या रुपाने HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला आहे.

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) सामान्य सर्दी आणि कोरोना व्हायरससारखी लक्षणे दर्शविते. त्यामध्ये खोकला, ताप व सर्दी यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे. कोविड-१९ नंतर पाच वर्षांनंतर ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही)चा प्रादुर्भाव चीनच्या अनेक भागांमध्ये वाढत आहे, ज्यामुळे अधिकारी चिंतेत आहेत. परिणामी, अधिकारी लोकांना मास्क घालणे आणि वारंवार हात धुणे यांसारखी खबरदारी घेण्याचे आवाहन करीत आहेत.