पन्हाळा प्रतिनिधी ( शहाबाज मुजावर):
शिवछत्रपती पुरस्कार विजेते कै.दिलीप जोशी यांच्या स्मरणार्थ सावकर-चषक 2025 भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गेली नऊ वर्षे पन्हाळा क्रिकेट क्लब यांच्याकडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. २ जानेवारी २०२५ रोजी सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन जनस्वराज्य चे प्रदेशाध्यक्ष सुमित दादा कदम यांच्या हस्ते झाले.
स्पर्धेचा अंतिम सामना ६ जानेवारी रोजी पार पडला.या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील नावजलेले १६ संघ खेळाडू सहभागी झाले होते.तर फायनल सामना दख्खन पन्हाळा विरुद्ध राजधानी स्पोर्ट्स यांच्यात पार पडला. यात दख्खन पन्हाळा संघ सावकर चषक चा मानकरी ठरला.
तर सेमी फायनल सामन्यासाठी दख्खन पन्हाळा,राजधानी स्पोर्ट्स, भारती स्पोर्ट्स ,बॉस 11, करवीर ग्रामीण स्पोर्ट्स या चार संघाची लढत झाली. यामध्ये पहिला सेमी फायनल चा सामना दख्खन स्पोर्ट्स विरुद्ध भारतीय स्पोर्ट्स यांच्या दरम्यान अतिशय प्रेक्षणीय ठरली .दख्खन स्पोर्ट्स ने भारती स्पोर्ट्स वर मात करत फायनल मध्ये प्रवेश केला. तसेच दुसरा सेमी फायनल मध्ये राजधानी स्पोर्ट्स ने करवीर ग्रामीण स्पोर्ट्स ला मात देत फायनल मध्ये प्रवेश केला. स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींनी गर्दी केली होती.
फायनल सामना अतिशय रोमांचक ठरला या सामन्यामध्ये दख्खन पन्हाळा कडून प्रथमेश राठोड यांनी अतिशय तिखट फलंदाजी करत राजधानीवर मात केली. या स्पर्धेत विजयी दख्खन पन्हाळा संघास चषक व रोख रक्कम १००७७७/- तर द्वितीय क्रमांक मिळालेल्या राजधानी या संघास ७७७७७/- चषक व रोक रक्कम बक्षीस मिळाले.
तर सेमी फायनल मध्ये पराभूत झालेल्या दोन संघना विभागून दहा दहा हजार रोख बक्षीस देण्यात आले.
यावेळी पन्हाळा शाहूवाडी विधानसभेचे आमदार विनय कोरे यांची उपस्थिती होती. खेळाडूंना मार्गदर्शन करताना आमदार कोरे म्हणाले ‘खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. सुदृढ आरोग्य ठेवण्यासाठी युवकांनी काही वेळ खेळण्याकरिता दिला पाहिजे.ग्रामीण भागांमध्ये क्रिकेट खेळाप्रती प्रचंड आवड दिसते तसेच खेळाच्या माध्यमातून सर्वच खेळाडूंनी करिअरचा मार्ग शोधावा ‘
यावेळी पन्हाळा माजी नगराध्यक्ष विजय पाटील,माजी उपनगराध्यक्ष रविंद्र धडेल,चैतन्य भोसले,जीवन पाटील,फक्रुद्दीन मुजावर,सचिन पाटील,हर्षद बच्चे,शैलेंद्र लाड,बाळासाहेब भोसले,मोहसीन मुल्ला,सागर गोसावी,रामानंद गोसावी,साहिल पवार, आधी उपस्थित होते.
या स्पर्धा पार पाडण्यासाठी ,मुनाफ मुजावर,नवाज फरास,अकिब मोकाशी,मोहसिन मुजावर ,अमीर गोलंदाज, लालू सोरटे,महेश कांबळे,मन्नान फरास,अशपाक गारदी ,केवल कांबळे,संग्राम कांबळे,सचिन गवंडी,विशाल कांबळे,शक्ती सोरटे यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेचे सूत्रसंचालन मुन्तजर मुजावर यांनी केले