Saturday, December 6, 2025
Google search engine
HomeSocialसामाजिक भान जपल्यास सोशल मिडीया ठरेल प्रभावीः चंद्रकांत पाटील

सामाजिक भान जपल्यास सोशल मिडीया ठरेल प्रभावीः चंद्रकांत पाटील

कोल्हापूरः प्रतिनिधी
गत दिड दशकाचा विचार करता सोशल मिडीयाने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. दळणवळण आणि संप्रेषणाच्या प्रभावी माध्यमांमुळे
समाजमाध्यमाचाही मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असून सहज उपलब्ध होणारे माध्यम म्हणून त्याच्याकडे पाहीले जात आहे. त्यामुळेच या माध्यमाने आता सामाजीक भान जपणे गरजेचे आहे. वस्तुनिष्ठतेला धरून घटनांची मांडणी केल्यास सोशल मिडीया प्रभावी ठरेल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

मराठी पत्रकार दिनानिमीत्त राज्य संघाच्या कार्यालयात आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष कृष्णात चौगले, सचिव सुरेश पाटील हे उपस्थित होते.

पाटील म्हणाले, साधारणतः २०१० नंतर सोशल मिडीयाचा प्रभाव वाढला. घरोघरी नव्हे तर प्रत्येकाच्या हाती अँड्राईड मोबाईल आल्याने तसेच देशभर वृत्तवाहिन्यांचे जाळे विस्तारल्याने मिनीटा-मिनीटाची खबरबात समजायला लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रात सरकार यायलाही हाच मिडीया बऱ्याच अंशी कारणीभूत ठरला. आज प्रत्येकजण पत्रकार म्हणून वावरताना दिसत आहे. त्यांच्या वावरण्यावर हरकत घेण्याची काहीच कारण नाही. मात्र आपण जे इतरांना पाठवतो, ते खरे आहे काय, त्याचे परिणाम काय याचा विचार होणे आवश्यक आहे अन्यथा सामुळे समाजविघातक गोष्टीही घडू शकतील.

सुरवातीला उपाध्यक्ष कृष्णात चौगले यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार तर सुरेश पाटील यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरवात केली. कार्यक्रमाला आकाश कांबळे, रूपाली चव्हाण, नाज अत्तार, विनोद धनवडे, मदु धनवडे ,सुरेश पाटील, बाजीराव फराकटे, दिपक मेटील, उत्तम पाटील, राजाराम पाटील, सदाशिव पाटील, निरंजन…विजय आरडे, विश्वनाथ मोरे, अवधूत आंबिलकर, ऋतूराज दळवी, अमृता पवार, …….
आदी उपस्थित होते. आभार बाजीराव फराकटे यांनी मानले तर सुत्रसंचलन उत्तम पाटील यांनी केले.
.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News