दोनवडे :शिंगणापूर येथील जिल्हा परिषदेच्या राजश्री शाहू छत्रपती निवासी क्रीडा प्रशाला येथे दिनांक 8 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत कुस्ती या प्रकारात विद्यामंदीर खुपीरे चा विद्यार्थी अवधुत सागर पाटील याने 45 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला .अवधूत एनायेस ( NIS) आखाडा, दोनवडे येथे सराव करतो.त्यास आखाड्याचे संदीप पाटील, सागर आनंदा पाटील, युवराज केरबा पाटील, शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले .