दोनवडे (प्रतिनिधी) : गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून खुपिरे ग्रामपंचायतीचे तीन सदस्य अपात्र ठरविण्यात आले आहेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हे आदेश दिले आहेत. अमर पांडुरंग कांबळे, शुभांगी अनिल पाटील व वनिता देवदास कांबळे अशी अपात्र ठरलेल्या सदस्यांची नावे आहेत. या निर्णयामुळे खुपिरे गावासह पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.
खुपिरे ग्रामपंचायतीची २०२१मध्ये निवडणूक झाली होती २०२१ ते २०२६ या कालावधीसाठी वरील तीन सदस्य निवडून आले होते. या तिन्ही सदस्यांनी गायरान जमिनीत अतिक्रमण करून घरे व शौचालय बांधल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात माजी सरपंच प्रकाश चौगुले व सागर चौगुले यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता. खुपिरे ग्रामपंचायतीत एकूण १५ सदस्य आहेत.