Wednesday, June 18, 2025
Google search engine
Homecrimeतिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी ; सहा भाविकांचा मृत्यू

तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी ; सहा भाविकांचा मृत्यू

तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यावं, अशी देशभरातील लाखो भाविकांची इच्छा असते. दररोज हजारो भाविक तिरुपती मंदिरात जाऊन बालाजी दर्शन घेतातही. तिरुपतीचं बालाजी मंदिर हे जागृत देवस्थान आहे. पण याच मंदिरात आज अतिशय मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात वैकुंठद्वार दर्शनासाठी असलेल्या पास केंद्रावर चेंगराचेंगरी झाल्याने सहा भाविकांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळपासूनच हजारो भाविक वैकुंठ द्वार दर्शनाच्या टोकन मिळवण्यासाठी तिरुपतीच्या विविध पास केंद्रांवर रांगेत उभे आहेत. या दरम्यान भाविकांना बैरागी पट्टीडा पार्क येथे पास घेण्यासाठी रांगेत उभं राहण्यास सांगितलं गेलं तेव्हा ही चेंगरा चेंगरी झाली ज्यामध्ये सहा भाविकांचा मृत्यू झाला.

चेंगराचेंगरीनंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला. त्यात सहा भाविकांचा मृत्यू झाला. यामध्ये मल्लिका नावाच्या एका महिलेचा समावेश आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तिरुपती पोलिसांनी प्रयत्न केले. त्यांनी थोड्याच वेळात परिस्थितीवर नियंत्रणही मिळवलं.

घडलेल्या घटनेबद्दल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री नायडू यांनी या घटनेतील जखमींवर करण्यात येत असलेल्या उपचारांबाबत अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदत कार्य करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून जखमींना चांगले उपचार मिळू शकतील.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News