Saturday, June 14, 2025
Google search engine
HomeAdministrativeभुसंपादन न झालेल्या अनधिकृत रस्ता कामकाजा बद्दल ग्रामस्थ आक्रमक

भुसंपादन न झालेल्या अनधिकृत रस्ता कामकाजा बद्दल ग्रामस्थ आक्रमक

राधानगरी – भुसंपादन न झालेल्या जमीनीतून अनधिकृत व बेकायदेशीररीत्या रस्ता कामकाज होत असलेबाबत तालुक्यातील शिरगाव, मुसळवाडी, कांबळवाडी, तरसंबळे कंथेवाडी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. न्याय न मिळाल्यास येत्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला या ग्रामस्थांनी आत्मदहनाचा इशारा दिला असून , जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हंटले आहे की, आमच्या खाजगी गट नंबरमधून आरे-पिरळ रोड तसेच कसबा तारळे ते दुर्गमानवाड रस्ता गेलेला आहे. सदर आरे-पिरळ हा रस्ता आमच्या जमीनीतून जात असलेबाबत आमच्या ७/१२ पत्रकी कोणतीही नोंद नाही. सन १९४९ ते आजअखेरचे सर्व कागदपत्रे आम्ही तपासली असता, आमच्या निदर्शनास असे आले की, शासनाकडून आमच्या जमिनीतून रस्ता जात असलेबाबत नोटीस आलेली नाही. तसेच संबंधीत रस्त्याचा आज अखेरपर्यन्त आम्हाला शासनाकडून कोणताही लाभ अथवा मोबदला मिळालेला नाही. तसेच जमीन भुसंपादन झालेचे कोणताही कागदोपत्री पुरावा किंवा कोणत्या आधारे जमीन भुसंपादीत केली याचे बाबतदेखील आपल्या कार्यालयाकडे पुरावे मिळत नाहीत. आम्ही वारंवार तलाठी कार्यालय, भुमी अभिलेख कार्यालय, तहसिल कार्यालय, नगररचना प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी केली असता, त्यांचेकडून लेखी अथवा समाधानकारक उत्तरे आजतागायत आम्हास मिळालेली नाहीत.

आता सध्या हा रस्ता पुन्हा रुंदीकरण होत असून आमची जमीन रस्ता रुंदीकरणासाठी शासन संपादीत करीत आहे. या संदर्भातील आम्हास कोणत्याही प्रकारे शासकीय, निमशासकीय, बांधकाम विभाग, नगररचना, भुसंपादन प्राधिकरण, तसेच ग्रामपंचायत तसेच शासकीय कार्यालयाकडून कोणतीही कल्पना अथवा नोटीस दिलेली नाही व आम्हास आजअखेर मिळालेली नाही. आज आम्हास कोणताही मोबदला न देता तसेच कोणतीही नोटीस न बजावता तसेच आमच्या जमीनी परस्पर काढून घेत आहेत. हा आमच्यावर अन्यायच आहे. आमच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह या जमिनीवर होत आहे. जमिनी अशा फुकापासी गेल्या तर आम्ही जगणार कसे? आमच्या होणाऱ्या नुकसानीस आपणच जबाबदार आहात. आम्ही वारंवार आमच्या होणाऱ्या नुकसानीबाबत कार्यालयाकडे दाद मागत आहे. तरीसुध्दा कोणीही लक्ष देत नाही कोणताही मोबदला न देता परस्पर जमीन काढून घेत आहेत. आम्हाला न्याय मिळावा म्हणून अर्जदार व सर्व कुटूंब दि. २६ जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहोत.

यावेळी एकनाथराव पाटील कंथेवाडीकर, नारायण रेडेकर, एकनाथ पाटील तरसंबळे, संग्रामसिंग कलिकते, प्रकाश कलिकते शिरगाव, एस बी पाटील, तानाजी पाटील, सातापा पाटील, बंडोपंत पाटील, सुरेश कृष्णा शिवाजी गौड, भिमराव कांबळे, महिपती कलिकते, राजेंद्र पाटील, गणपती खाडे, सौरभ कलिकते, शिवाजी पाटील, निवास कोगेकर, डॉ विरेंद्र जांभळे, क. तारळे, तारळे खुर्द, कंथेवाडी, तरसंबळे, कांबळवाडी, मुसळवाडी, शिरगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News