Saturday, December 6, 2025
Google search engine
Homecrimeसोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाने राज्य सरकारची मदत नाकारली

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाने राज्य सरकारची मदत नाकारली

|| सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला राज्य सरकारने जाहीर केलेली मदत सूर्यवंशी कुटुंबाने नाकारली आहे. 10 लाख रुपयांचा शासकीय मदतीचा धनादेश कुटुंबाला देण्यासाठी प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी बुधवारी त्यांच्या घरी भेट दिली. मात्र, न्याय मिळेपर्यंत मदत स्वीकारणार नसल्याची भूमिका कुटुंबाने घेतली. संविधान अवमान आंदोलनानंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi ) यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. त्यांना 15 डिसेंबरला अटक झाली होती. मात्र आता त्यांच्या कुटुंबाने शासकीय मदत स्वीकारण्यास नकार दिल्याने राज्य सरकारसाठी ही मोठी चपराक मानली जात आहे.

पोलीस मारहाणीमुळे मृत्यू?

सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीमुळे झाला नसून, न्यायालयीन कोठडीत असताना त्यांच्या छातीत अचानक जळजळ सुरु झाली आणि रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली होती.

मुख्यमंत्र्यांनी सोमनाथ सूर्यवंशी   यांच्या मृत्यूचा तपशील सभागृहात मांडला. सोमनाथ हे आंदोलक होते आणि कायद्याचे शिक्षण घेत होते. ते मूळचे लातूरचे होते आणि त्यांचे कुटुंब पुण्यात राहायचे. सोमनाथ हे परभणीत शिक्षण घेत होते. परभणीत जी जाळपोळ सुरू होती, त्या व्हिडिओत सूर्यवंशी दिसत असल्याने त्यांना अटक करण्यात आली होती.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News