दिंडनेर्ली:
एस.टी महामंडळाच्या संभाजीनगर आगारात रस्ते सुरक्षा अभियानाचे उद्घाटन शहर वाहतूक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागाचे यंत्र अभियंता यशवंत कानतोडे होते.
नंदकुमार मोरे यांनी संभाजीनगर आगाराच्या चालकांना रस्ते सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. आतापर्यंत विना अपघात सेवा बजावणाऱ्या सर्व चालकांचे कौतुक केले.सर्वांनी रस्ता सुरक्षा अभियान पुरते खबरदारी न घेता नेहमीच सतर्क राहून काम करावे असे सांगितले. सर्व चालक आणि कर्मचारी यांनी रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी करावा असे आवाहन केले. आगर व्यवस्थापक स्वप्निल पाटील, कार्यशाळा अधीक्षक राहुल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश खांडेकर यांनी केले तर आभार स्थानक प्रमुख सुरेश शिंगाडे यांनी मानले.
याप्रसंगी आगारातील अधिकारी, कर्मचारी,चालक,वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.