प्रयाग चिखली वार्ताहर:
केर्ली (ता. करवीर) येथील पावणे चार कोटीच्या पाणी योजनेचे उद्घाटन गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले यांच्या हस्ते तर सरपंच सौ विजयमाला बाबासाहेब चौगले यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच पार पडले .
यावेळी माजी मंत्री सतेज पाटील यांच्या सहकार्यातून आणि गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली चार वर्षात केर्ली ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील अंतर्गत रस्ते, गटारी, प्राथमिक शाळा दुरुस्ती, शाळा कंपाऊंड, शुद्ध पाणी योजना, ग्रामपंचायत कार्यालय करंट रिपेरी, स्मशानभूमी हनुमान मंदिर हॉल मरगुबाई मंदिर हॉल अशी सुमारे आठ कोटीची विकास कामे झाली असून पाणी योजनेचे बहुतांशी काम पूर्ण झाल्याची माहिती उपसरपंच दीपक पाटील यांनी दिली .
सचिन चौगले सरदार चौगले राजाराम व्हरांबळे वसंत गवसे भगवान माने मोहन पाटील विश्वास कदम शिवाजी चौगले महेश सुतार बाळू माने दीपक संकपाळ उत्तम पाटील धनाजी गवळी भीमराव शिंदे ग्रा. पं सदस्या- सौ नीलम माने जयश्री पाटील संदीप कांबळे अलका कदम चंद्राक्का मगदूम सखुबाई कांबळे कविता कांबळे कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते
आभार ग्रामपंचायत अधिकारी आशा घुगे यांनी मानले