Saturday, June 14, 2025
Google search engine
Homecrimeगांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक; दोन लाखांचा गांजा जप्त

गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक; दोन लाखांचा गांजा जप्त

कोल्हापुर- स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या कैलाशसिंह उदयसिंह राजपूत (वय22)आणि किशनसिंह दौलतसिंह राजपूत (वय 21.दोघे रा.जालोकी मंदीर ,पोष्ट खमनौर ,राजस्थान) या दोघांना अटक करून त्यांच्या कढील दोन  लाख रुपये किमंतीचा साडे दहा किलो वजनाचा गांजा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात ठिकठिकाणी चालू असलेल्या अवैद्य व्यवसाय अंमली पदार्थांचा साठा करून विक्री करीत असलेल्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.या अनुशंगाने माहिती घेत असताना या पथकातील पोलिसांना मोरेवाडी चौक परिसरातील हॉटेल ड्रीमलँड येथे गांजा अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी दोघे जण येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून त्यातील एक जण  सॅक घेऊन  आणि दुसरा प्रवासी बँग घेऊन थांबला होता.त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडील बँगेची तपासणी केली असता बेकायदेशीर पणे विक्री साठी आणलेला  साडे दहा किलो वजनाचा  दोन लाख रुपये किमंती गांजा अंमली पदार्थ मिळाल्याने पोलिसांनी जप्त करून त्यांना अटक केली.त्यांच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात  एनडीपीएस  कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News