राधानगरी – प्रथमेश एज्युकेशन सोसायटी व जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्था इचलकरंजी यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये सादळे मादळे हायस्कूल मादळे येथील सहाय्यक शिक्षक संभाजी आनंदा आडूरकर मु . पो जाखले ता.पन्हाळा जि.कोल्हापूर यांना प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळाला.
आडुरकर यांनी इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास आणि इयत्ता सातवी भूगोल या विषयातील व्हिडीओ निर्मिती केली होती.
आडुरकर यांनी यापूर्वी ही अनेकदा असे यश संपादन केले आहे. राज्यातील शिक्षकामध्ये तंत्रस्नेही चळवळ निर्माण व्हावी,शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी , यासाठी सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, डीएड शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी संस्थेतर्फे राज्यस्तरीय व्हिडीओ निर्मिती स्पर्धेचे आयोजन केले होते.
आधुनिक तंत्र, लेक्चर शैली, वकृत्च, मांडणी, नाविन्यता , विद्यार्थी केंद्रीत आशय, अध्ययन निष्पती आदी प्रमुख बाबी परीक्षण करताना विचारात घेण्यात आल्या. आडुरकर गेली 18 वर्षे सादळे मादळे हायस्कूल मादळे माध्यमिक विभागामध्ये भूगोल विषयाचे अध्यापन करीत आहेत. या निवडीबद्दल आडूरकर यांचे विनाअनुदानित कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे , सर्व पदाधिकारी, संचालक , सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघ, आजी- माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ, सर्व शैक्षणिक वर्तुळ यांनी अभिनंदन केले आहे. यासाठी त्यांना ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ अंबपचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप तोडकर, उपाध्यक्ष विवेक तोडकर, सचिव विनय तोडकर, शाळेचे मुख्याध्यापक धनाजी पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.