Monday, November 10, 2025
Google search engine
HomeSportसंजय घोडावत इन्स्टिट्यूट वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात

संजय घोडावत इन्स्टिट्यूट वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात

कोल्हापूर: संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डिप्लोमा अभियांत्रिकी, शॉर्ट-टर्म विभाग, आयटीआय सर्व शाखांच्या क्रीडा स्पर्धा २०२४-२५  इन्स्टिट्यूटचे संचालक,  डॉ. विराट गिरी यांच्या मार्गदर्शना खाली नियोजनबद्ध आणि उत्साहात नुकत्याच संपन्न झाल्या आहे.
 
तीन दिवस चालेल्या या क्रीडा स्पर्धेत सर्व विभागाच्या सिव्हिल, कॉम्पुटर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल  विभागांच्या १००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी विविध क्रीडाप्रकारात सहभाग नोंदवला. या  क्रीडा स्पर्धेचे प्रमुख समन्वयक प्रा. विनायक पावटे, प्रा. प्राजक्ता मलगे यांनी सामन्यांचे नियोजनबद्ध वेळापत्रक तयार करून सर्व सामने शिस्तबद्ध पार पाडले.  या स्पर्धेत सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक, लॅब असिस्टंट आणि ऑफिस बॉय यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

फुटबॉल विजेता संघ एस वाय मेकॅनिकल, उपविजेतासंघ एफवाय-टी वाय सिव्हिल, क्रिकेट विजेता एस वाय टी वाय कॉम्पुटर, उपविजेता एस वाय टी वाय इलेक्ट्रिकल, टग ऑफ वॉर विजेता एफवाय एसवायटीवाय कॉम्पुटर उपविजेता- एफ वाय एसवाय टीवाय मेकॅनिकल, कबड्डी मुले विजेता एसवाय सिव्हिल उपविजेता एस वाय टी वाय कॉम्पुटर.

वार्षिक क्रीडा स्पर्धेत संजय घोडावत विद्यापीठा चे चेअरमन संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News