Wednesday, June 18, 2025
Google search engine
Homecrimeसाध्या वेशात जाउन पोलिसांनी चंदगड- कोवाड मध्ये एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांना पकडले...

साध्या वेशात जाउन पोलिसांनी चंदगड- कोवाड मध्ये एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांना पकडले ; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दमदार कारवाई

कोल्हापूर:

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कोवाड येथील एसबीआय शाखेचे एटीएम फोडून पळून गेलेल्या राजस्थान मधील चार आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी साध्या वेशात सापळा रचून पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद रोड जवळील मनोर गावातील सहारा मेवात या धाब्यावर मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कोवाड तालुका चंदगड येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी गॅस कटरने कापले होते. त्यातील 18 लाख 77 हजार 300 इतकी रोख रक्कम घेऊन चार चाकी वाहनातून पलायन केले होते. ही माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी केली होती पण पोलिसांच्या वाहनाला त्यांनी धडक दिली. दरम्यान त्यांची गाडी बंद पडली आणि ते सर्वजण पळून गेले . या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस प्रमुखांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व त्यांच्या सहकाऱ्यांना करण्याचे सांगितले. ते तपास करत असताना आरोपीची हुंडाई कंपनीची क्रेटा चार चाकी गाडीला एम एच झिरो वन EV 9918 ही नंबर प्लेट बनावट असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला लक्षात आले. मूळ क्रमांक राजस्थान मधील होता. पोलिसांच्या पथकाने राजस्थान येथे जाऊन गाडी मालकाची भेट घेतली गाडी. मालकाने आपला मित्र तसलीम खान यांने ही गाडी कामानिमित्त घेऊन गेल्याची सांगितले पोलिसांनी संशयतांची माहिती गोळा केली. ते सर्वजण पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद रोडवरील मनोर गावातील सहारा मेवात धाबा परिसरात असल्याचे समजले व सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे दीपक घोरपडे महेश पाटील राजू कांबळे हंबीर अतिग्रे यांनी धाबा परिसरात साध्या वेशात जाऊन सापळा लावला आणि आरोपी तसलीम इसा खान वय 20 ,अली शेर वय 29, जमालू खान वय 29, तालीम पप्पू खान वय 28,अक्रम शाबु खान वय 25, हे सर्वजण मशिदी जवळ, सामदिका, तालुका पहाडी, राज्य- राजस्थान येथील रहिवासी आहेत त्यांच्याकडून चोरी केलेली रक्कम व गॅस कटर ताब्यात घेतले या सर्वांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News