प्रयाग चिखली वार्ताहर:
करवीर तालुक्यातील नवीन चिखली-सोनतळी येथील नवीन वसाहत मधील चिखलीच्या पोलीस पाटलांच्या मालकीचे सोनार दुकान बुधवारी मध्यरात्री चोरट्यानी फोडून सुमारे एक लाखावर रकमेच्या दागिन्याची चोरी केली. गुरुवारी सकाळी घटना घडल्याचे निदर्शनास आले. चोरीच्या पंचनाम्यासाठी नेहमीच लगबगीत असणाऱ्या खुद्द पोलीस पाटलांचेच दुकान चोरट्याने फोडल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. दरम्यान घटनास्थळी करवीर पोलिसांनी पंचनामा केला आहे
प्रयाग चिखलीच्या पोलीस पाटील सौ. अरुणा दळवी यांचे पती कुमार दळवी यांच्या मालकीचे *ऋतू ज्वेलर्स* नावाचे सोनार दुकान नवीन चिखली- सोनतळी येथे चालू आहे. बुधवारी मध्यरात्री चोरट्याने या दुकानात चोरी करून सुमारे एक लाखाचे छोटे छोटे दागिने लंपास केले चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने दुकानाचे शटर उचकटून काढले तसेच तिजोरी फोडली आहे त्याचबरोबर दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा फोडला आहे
दुकानातील साहित्य विस्कटून टाकले आहे. दुकानातील सोने चांदीचे छोटे दागिने चोरट्याने लंपास केले आहेत
याबाबत करवीर पोलिसांनी घटनास्थळी स्वान पथकासह पंचनामा केला. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण निरीक्षक रवींद्र कळंबकर यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस कॉन्स्टेबल राजू येडगे महेंद्र कोरवी यांनीही तपास यंत्रणा राबविली आहे
गेल्या दिड दोन वर्षापासून नवीन चिखली येथील नवीन वसाहती मधील 25-30 घरे चोरट्यानी फोडली आहेत पोलिसांच्या व नागरिकांच्या सतर्कतेमुळे गेल्या काही दिवसापासून चोरी झाली नव्हती मात्र बुधवारी मध्यरात्री चोरट्यानी गावच्या पोलीस पाटलांचेच सोनाराचे दुकान फोडले त्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे त्याचबरोबर पोलिसांच्या पुढे देखील चोरांना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले आहे
पोलीस पाटलांचे दुकान फोडून एक प्रकारे पोलीस यंत्रणेलाच चोरट्याने दणका दिल्याचे स्पष्ट झाले आहे
त्यामुळे आता तरी पोलीस यंत्रणा कसून तपास करणार का असा प्रश्न सामान्यातून उपस्थित होत आहे