कोल्हापूर: 14 जानेवारी रोजी व्हीनस कॉर्नर येथील सिग्नल जवळ अज्ञात पाच ते सहा जणांनी मिळून काहीही कारण नसताना के एम टी बसवर दगडफेक केली आणि बसची तोडफोड केली त्यात बसचे पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले आणि हे सर्वजण पळून गेले होते. अशा विनाकारण दहशत माजवणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज दुपारी ताब्यात घेतले दहशत माजवल्यानंतर हे आरोपी सापडत नव्हते पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी अमलदार संतोष बर्गे वैभव पाटील प्रवीण पाटील महेंद्र कोरवी यांचे एक पथक तयार केले होते त्यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे या गुन्हेगारांची माहिती काढली सायबर चौकात ते येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सापळा रचून अर्जुन अभिषेक मंगेश घोडके वय 26 राहणार राजारामपुरी असिफ नायकवडी वय 30 राहणार इंगळी तालुका हातकणंगले ओंकार जगन्नाथ चौगुले वय 22 राहणार पाथरूड गल्ली सायबर चौक व एक विधी संघर्ष ग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले त्यांनी गुन्हा कबूल केला आहे.