Saturday, December 6, 2025
Google search engine
HomeSocialशिवपानंद शेत रस्ते चळवळीच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शिवपानंद शेत रस्ते चळवळीच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पन्हाळा प्रतिनिधी  (शहाबाज मुजावर ):
शिवपानंद शेत रस्ते चळवळ महाराष्ट्र राज्य
प्रणेते शरदराव पवळे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा चळवळ कृती समिती सदस्य यांच्या वतीने कोल्हापूर महसूल विभाग उपजिल्हाधिकारी स्वप्निल पोवार यांना निवेदन देण्यात आले.

 निवेदनामध्ये शिवपानंद शेतरस्त्यांच्या नंबरींचे सर्वेक्षण करून नंबरी हलवणाऱ्यांना दंड सुरू करा, जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हयातील सर्व तहसील कार्यालयातील प्रलंबित शेतरस्ता केसेस निकाली काढण्याचे तातडीने आदेश द्यावेत,
समृद्ध गावांसाठी ग्रामस्तरीय शेतरस्ता समित्यांची स्थापना करून समित्यांच्या कार्यवाहीचा अहवाल शासनाने घ्यावा,
चालू वहीवाटीच्या प्रत्येक शेतरस्त्याचे सर्वेक्षण करून ग्रामपंचायतींना नोंदी करून घेण्याचे आदेश द्यावेत,
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा,शेतरस्त्याअभावी पडीक राहणाऱ्या शेतजमीन भुधारकास विनाअट नुकसान भरपाई देण्यात यावी.नकाशावरील शेतरस्त्यांच्या मोजणी व संरक्षण फी बंद करा. अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी उपजिल्हाधिकारी पोवार यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना लवकरच रस्ते विषयक परिपत्रक आदेश लवकरच पारित करू असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा कृती समिती इंद्रजीत जाधव,दीपक बाजीराव कांबळे, भीमराव शिवराज जाधव,शरद बाळासो जाधव,रोहित अर्जुन खोत,उत्तम ज्ञान जाधव, आनंद ज्ञानू जाधव,तानाजी आबासो जाधव ,कृष्णात भगवंत जाधव, नूर मोहम्मद फक्रुद्दीन मुजावर ,आनंद ज्ञानू पाटील व इतर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News