Saturday, December 6, 2025
Google search engine
HomePOLITICALधामोडच्‍या उपसरपंचपदी नेत्रांजली कोरे बिनविरोध

धामोडच्‍या उपसरपंचपदी नेत्रांजली कोरे बिनविरोध

राधानगरी – धामोड (ता. राधानगरी ) येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी नेत्रांजली विनय कोरे यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी सरपंच रेश्माताई नवणे होत्या. विमल बोडके यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते. नेत्रांजली कोरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड केली. पिठासीन अधिकारी म्हणून ग्रामसेवक संतोष गुरव यांनी काम पाहिले. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सदाशिवराव नवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. त्यांनी यावेळी नूतन उपसरपंच नेत्रांजली कोरे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी धामोड ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पदाधिकारी तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कोरे यांच्या निवडीनंतर फटाक्यांच्या आतषबाजीत आणि गुलाल उधळून त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी सौ. कोरे यांचे जल्लोषात स्वागत केले.

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी व महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी कार्य करणार असल्याचे उपसरपंच नेत्रांजली कोरे यांनी सांगितले. सर्वसामान्य कुटुंबातील एक महिला उपसरपंच पदी विराजमान झाल्याने कोरे यांच्यावर पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News