उंचगाव: करवीर तालुक्यातील चिंचवाड गावच्या उपसरपंच पदी राहुल कुमार पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेचे अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच श्रद्धा प्रशांत पोतदार उपस्थित होत्या. उपसरपंच पदासाठी राहुल पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून दीपक गंगाधर यांनी काम पाहिले.