Wednesday, June 18, 2025
Google search engine
Homecrimeयामाहा मोटार सायकली चोरणाऱ्या दोन बालकांसह एकास अटक ; स्थानिक गुन्हे अन्वेषण...

यामाहा मोटार सायकली चोरणाऱ्या दोन बालकांसह एकास अटक ; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

कोल्हापूर: 

जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी वाढत्या दुचाकी चोरीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सूचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलिसांना अंमलदार यांच्या सहकार्याने पथक नेमण्यात आले. या पथकाने जिल्ह्यातील चोरी झालेल्या ठिकाणी तपास करत तसेच सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीचा आधार घेत तपास सुरू केला. त्यावेळी त्यांना गोपनीय माहिती मिळाली की गडहिंग्लज मध्ये दोन इसमांच्याकडे चोरीची यामाहा मोटरसायकल आहे व ते ती यामाहा गाडी घेऊन एम आर चौक, गडहिंग्लज येथे येणार आहेत.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 17 जानेवारी रोजी एम आर चौक गडहिंग्लज येथे सापळा रचून नंबर नसलेली चेरी कलरची यामाहा RX -100 सह दोन इसमांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्या ताब्यात असलेली मोटरसायकल ही चोरीची असून तिच्यावर गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळाली. यावेळी त्यांनी चोरलेल्या मोटरसायकली त्याचा साथीदार साहिल अशोक शिंदे राहणार पोसरातवाडी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर यांच्याकडे विक्रीस दिल्याचेही सांगितले. त्याप्रमाणे साहिल शिंदे व त्याच्यासोबत असणाऱ्या दोन विधी संघर्ष बालकांना अटक करून त्याच्याकडून रुपये पाच लाख किमतीच्या 10 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. त्यामध्ये गडहिंग्लज पाच, मुरगुड एक ,नेसरी एक, आजरा दोन या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील
व गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली एक मोटरसायकल हस्तगत करण्यात आली.
दोन्ही विधी संघर्ष बालके व आरोपी साहिल शिंदे वय 20 यांना गडहिंग्लज पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलिस अंमलदार विजय पाटील, महेश इंगळे, विशाल चौगुले, संदीप बेंद्रे, राजू कांबळे, संजय कुंभार, लखन पाटील ,संजय देसाई, कृष्णात पिंगळे तसेच शाहुवाडी पोलीस ठाण्याचे अमीर नदाफ गांधीनगर पोलीस ठाण्याचे मुन्ना कुडची आदींनी केली आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News